मुल्ला गावात भर पावसाळ्यात अग्नी तांडव..

अमरदिप बडगे, प्रतिनिधी

शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान…जिवीत हाणी नाही

देवरी अग्निसमकच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण

गोंदिया – जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील मुल्ला गावात ऐकाच गावातील चार भावांच्या गोठ्याला भर वापसाळ्यात रात्री दरम्यान अचानक आग लागल्याने गावात हाहाकार माचला होता. तर वेळेवरच देवरी नगरंचायतच्या अग्निशमक वाहनाला पाचारन करत आगिवर नियंत्रन मिळविण्यात आला.

मुल्ला येथिल येथील श्रीराम मुनेश्वर, विश्वनाथ मुनेश्वर, नारायन मुनेश्वर, संजय मुनेश्वर यांच्या घरातील जनावरांच्या गोठ्याला रात्री १२.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. यात शेती साहित्या सह गुरांच्या चार्यांचा असा लाखो रुपयांचा साहित्य भस्मसात झाले. तब्बल पाच तास धुमसत असलेल्या या आगीवर नियंत्रय मिळविण्यासाठी गावातील नागरीकांसह अग्निशमक दलालला चांगलीच कसरत करावी लागली. या घटनेने मुल्ला गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

सदर आग शॉट सर्कीटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविल्या जात आहे. रात्रीची वेळ असल्याने आग तात्काळ लक्षात आली नाही. मात्र या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. धुराचे लोटच्या लोट निघत होते. या आगीची माहिती तात्काळ देवरीच्या अग्नीशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर तब्बल पाच तासाने आगीवर नियंत्रण मिळविता आले. आगीची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रन मिळविण्यात आले. तर शेतकर्यांनी नुकसान भरपाईची मागनी शासन दरबारी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटना

Mon Jul 18 , 2022
बचाव कार्यावर स्वतः मुख्यमंत्री लक्ष ठेऊन बचावलेल्या प्रवाशी व जखमींना तातडीने सर्व मदत मिळेल ती पाहण्याचे प्रशासनाला निर्देश अपघातानंतर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चाhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 मुंबई दि १८: मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com