संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी – आनंद नगरातील खुशी सुनील हजारे आणि श्रुती दिनेश भुरे या कष्टकरी मुलींनी बारावीच्या परिक्षेत उल्लेखनीय यश मिळविले याबद्दल भाजप च्या वतीने त्यांचा सत्कार करून कौतुक करण्यात आले.
समाजभवन आनंदनगर रामगढ कामठी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी दोन्ही कष्टकरी विद्यार्थीनीं ना पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह प्रदान केले
भाजपा पदाधिकारी संजय कनोजिया, राजेश खंडेलवाल,विक्की बोंबले,नगरसेवक लालसिंग यादव,बिरजु चहांदे,अवि गायकवाड, महेंद्र वंजारी,दिनेश खेडकर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी कार्तिक चव्हाण,प्रफुल्ल वासनिक, सेवाराम टंडन, केवल लांजेवार,हर्ष धुर्वे,गेंदलाल सोलंकी,आशिष रामटेके, विलास शिंगाडे,विरेंद्र राऊत,प्रल्हाद सोनवणे,रविंद्र मरई, विरेंद्र राऊत,छाया कोल्हे,खोमेशरी शाहु,जया मेश्राम, विद्या बोंबले, निशा मेश्राम,आशा सहारे,शितल कोटांगले, मंगला डोंगरे,अमिता फुलझेले, रेखा पौणिकर यांनी सहकार्य केले.