संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 14:- उन्हाळा म्हटला की शहरात दरवर्षी पाण्याची टँचाई जाणवते व सर्वत्र पाणी मिळत नसल्याची ओरड सुरू होते या बाबी गांभीर्याने लक्षात घेत नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अथक प्रयत्नाला आलेल्या यशातून कामठी नगर परिषद ला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियांन योजना अंतर्गत कामठी शहरात निर्माण करणाऱ्या तीन पाण्याच्या टाकी व पर्जन्य जलवाहिनी प्रकल्प हेतू 5 कोटी 76 लक्ष 43 हजार रुपयांच्या मंजुर झालेल्या प्रथम टप्पाचा निधी नगर परिषद ला प्राप्त होताच शहरात नियोजित असलेल्या तीन ठिकाणी पाणी टंकी निर्माण करण्याच्या कार्याला गती देण्यात आली यानुसार जुने प्रभाग क्र 3 मध्ये असलेल्या अशोक नगर परिसरात कार्यान्वित असलेल्या पाणी टंकी बांधकाम हे मागील दहा वर्षपासून अर्धवट स्थितीत थंडबसत्यात आहे तर संबंधित कंत्राटदाराने बांधकाम साहित्य घेऊन सुद्धा बाहेर पडला त्यामुळे मागील दहा महिन्यापासुन थंडबसत्यात असलेल्या बांधकामाला गती मिळणार का? तसेच हे बांधकाम संथगतीने असल्याने पाण्याच्या प्रश्न निकाली न लावणे हे तर नागरिकांशी विश्वासघात करण्याचा प्रकार असल्याचा आरोप माजी नगरसेवक रघुनाथ मेश्राम यांनी केला आहे.
.कामठी शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेत माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी नगर परोषद ला अडीच वर्षांपूर्वीच 5 कोटी 76 लक्ष 43 हजार रुपयांचा निधी मिळवून दिला व या निधींतुन शहरातील कुंभारे कॉलोनी, अशोक नगर व इस्माईलपुरा या तीन ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारण्याचे नियोजित होते व या तीन पाण्याच्या टाकीतुन संपूर्ण शहराला 24 तास शुद्ध पाणी मिळणार होता यानुसार नियोजित तिन्ही ठिकाणी टाकी उभारणीचे बांधकामाला गती देण्यात आली.मात्र प्रभाग क्र 3 अशोक नगर येथे पाण्याच्या टाकीचे कार्यान्वित बांधकाम हे मागील दहा महिन्यापासून बंद अवस्थेत असल्याने ही अर्धवट पाण्याची टाकी शोपीस होउन बसली आहे परिणामी या प्रभागातील अशोक नगर, खलाशी लाईन, हबाबपुरा आदी भागात असलेल्या पाण्याची समस्या अजूनही कायम आहे.परिणामी याहीवर्षी पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागला.तर यासंदर्भात विचारले असता मुख्याधिकारी ने योजनेच्या मंजूर निधीचा पहिला टप्पा संपला असून दुसऱ्या टप्प्याचा निधी येताच कामाला सुरुवात करण्यात येईल असे सांगितले.
-जुने प्रभाग क्र 16 येथे सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असलेल्या खड्ड्यात मागील वेळी एक गाय पडली असता सुदैवाने गायीची जीवितहानी टळली असून याही ठिकाणी काम थंडबसत्यात आहे यासंदर्भात माजी नगरसेवक प्रतीक पडोळे यांनी सुद्धा नगर परिषद प्रशासनाकडे तक्रार करीत बांधकामास गती देण्याचे सांगितले तरीसुद्धा बांधकामाला गती येईना ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.