अमरदिप बडगे
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुरमाडी गावातील जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मामेतलाव येथिल बाभुळचे 36 झाडांची कत्तल करून याच गावातील सरपंच याने एका ठेकेदार विकल्याचा धक्कादायक प्रकार गावकऱ्यांनी उघडकीस आणुन दिला आहे.
मुरमाडी गावात मामेतलाव असुन तेथे बाभुळची झाडे आहेत.तिच 36 झाडाची कत्तल करुन गावातील सरपंच याने शरद नामक ठेकेदार विकले आहे. याबाबद वनविभागाचे अधिकारी कळवे यांना विचारले असता मी जाऊन पंचनामा केला आहे.सदर मामेतलाव हा जिल्हा परिषदेचे क्षेत्र असल्याने ते कारवाई करतील . सरपंचाला देखील विचारले असता त्यांनी मी झाडे विकले असल्याचे सांगितले. मुरमाडी गावातील ग्रामसेवक चव्हाणशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलले नाही. याअगोदर एका गावातील नागरिकाने याच तलावातील झाडे कत्तल केली असता सरपंच याने 500 रुपयांचे दंड घेतले असल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले. हां मामेतलाव जिल्हा परीषदेचा असुन झाड़े कतली साठी परवानगी कुणाकडून घेतली आहे अनेक प्रश्न समोर येत आहेत.दशरथ टेकाम व सदाम मेश्राम व इतर गावातील नागरिकांनी झाडांची कतल ची बाब समोर आणली आहे. यावर जिल्हा परिषद सरपंचावर कोणती कारवाई करते .याकडे गावकराचे लक्ष लागून आहे. एकिकडे शासन झाडे लावा झाडे जगवा ही योजना राबवित असते परंतु चक्क सरपंच पारधी यानेच झाडे विकुन ठेकेदाराने झाडांची कत्तल केली यावर संबंधित विभागाचे अधिकारी का पाऊल उचलतात याकडे गावातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.