नितीन लिल्हारे
मोहाडी : भाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष राहिला नाही, येथे सामान्य कार्यकर्त्यांचा विचार केला जात नाही,
भाजपचे नेते कितीही ओरडून सांगत असले, तरी त्यात तथ्य नाही. खरं म्हणजे भाजप हा मोजक्या लोकांचा पक्ष आहे, असा घणाघाती आरोप भाजपमधून निष्कासीत झालेले माजी आमदार चरण वाघमारे यांनी विकास फाउंडेशन संवाद कार्यक्रमात बोलत ते होते.
येणाऱ्या ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या निवडणूक लक्षात घेता विकास फाउंडेशने कंबर कसली आहे.
विधानपरिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांच्यामुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्यांतील राजकीय वातावरण खराब झाले. भाजप पक्षश्रेष्ठींनी वातावरण निवळण्यासाठी फुके यांना नागपूरला परत बोलविण्याचे ठरविले होते, मात्र फुके नागपूरला परत आल्यास आपले पद-आपली जागा धोक्यात येईल, हे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना वाटत होते, त्यामुळे आमदार फुके यांना भंडारा अडकवून ठेवण्यासाठी बावनकुळेंनी मला निष्कासीत करण्याचा हा डाव खेळल्याचा आरोप वाघमारे यांनी केला. दुसरीकडे भाजप कितीही ओरड करत असला की भाजप हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे, पण हे सर्व धादांत खोटे असून भाजप हा मोजक्या लोकांचा पक्ष असल्याचा आरोप मोहाडी येथील महादेव मंदिरात हजारो कार्यकर्त्यांशी विकास फाउंडेशन संवाद कार्यक्रमात माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला आहे.
मी सद्या कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही, वेळ पडल्यावर सर्वांना विचारून निर्णय घेईल,भंडारा जिल्हा परिषद मध्ये काँग्रेस-विकास फाउंडेशन युती पाच वर्षे कायम राहील, आणि जिल्हाचा विकास कसा होईल याकडे लक्ष राहील. आगामी नगरपरिषद कशी लढू हे रणनीती सुरू आहे.
जिल्ह्यात येत्या काही दिवसात ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणुकीचे बिकुल वाजणार आहे. या साठी सर्वच राजकीय पक्ष आता मैदानात उतरतांना दिसत आहे. युवक वर्ग आपल्या पक्षाचा मतदार कसा होईल व तो पक्षात कसा येईल या साठी सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळ्या पध्दतीने कार्यक्रम करीत युवकांना आकर्षीत करीत आहे.
विकास फाउंडेशनच्या वतीने येणाऱ्या ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या निवडणुकीत. विकास फाउंडेशन युवकांन सामोर जाण्यासाठी व त्यांना पक्षात सामिल करण्यासाठी कंबर कसत आहे. येणाऱ्या निवडणुकीत युवक वर्ग विकास फाउंडेशनचा मतदार कसा होईल. व विकास फाउंडेशन युवकांन मध्ये बळकट कशी होईल या साठी जिल्ह्यात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विकास फाउंडेशन कार्यकर्ते मध्ये आपले पाय रोयाला सुरुवात केले आहे.
मोहाडी तालुक्याच्या वतीने कार्यकर्ते मध्ये विकास फाउंडेशन संवाद कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमात विकास फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुप्रसिद्ध वक्ते चरण वाघमारे यांनी भारतीय जनता पार्टी व आमदार, खासदार, आजी माजी नेत्यांची आपल्या भाषणातून पोलखोल केली. या वेळी
जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप ताले, सभापती बाल्या सेलोकर, सभापती नंदू रहांगडाले, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाऊराव तुमसरे, उपसभापती बबलू मलेवार, युवराज जमाईवार, हरीचंद्र बंधाटे, नगरसेवक सेवक चिंधालोरे, हिरालाल रोखडे, हंसराज आगाशे, चंदू पिल्लारे, व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.