संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 19 :- दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रविवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी कामठी तालुक्यातील आजनी येथे गावातील सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरातील प्रतिमेला माजी आमदार देवरावजी रडके यांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात नवयुवक युवा मंडळ, वीर बजरंग क्रीडा मंडळ, जय बजरंग क्रीडा मंडळ, रेणूका क्रीडा मंडळ, सावित्रीबाई जोतीराव फुले अभ्यासिका आणि वाचनालयातील विद्यार्थी, ग्राम पंचायत कर्मचारी यांच्या संयुक्त सहकार्यातून ६१ दात्यांनी रक्तदान करून सेवा दिली.
रक्त संकलन तिरपुडे रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी संकलित केले. तर या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच संजय भाऊ जीवतोडे, उपसरपंच हेमराज दवंडे, पंचायत समिती सदस्य उमेशभाऊ रडके, तुकाराम लायबर, ज्ञानेश्वर वांढरे, दिवाकर घोडे,अनिकेत इंगोले, गणपत झलके, सुनील मेश्राम, सचिन ढोले, कामरान भाई, सुधाकर विघे, विनोद वाट, आकाश देवतळे, हेमलता उकेबोंद्रे, गायत्री हरणे, खुशाल येलेकार, हरीचंद्र धर्मी, रुपेश चौके, शुभम रडके, मपित कोठाडे, राहुल महल्ले, कैलास लायबर, लोकेश वहिले, अक्षय दवंडे, अतुल पाटील, विजय वानखेडे, शेषराव बोंबाटे, सुरेश वाट, सचिन भाऊ डांगे, विकास कनोजे, पराग रडके, कवडू चींचुलकर, अनिकेत हेटे, दीपक नारनवरे, डोमाजी पाटील, विठ्ठल विघे, दिनेश बडगे, ताराचंद जेवडे, राहुल गिऱ्हे, जीवन विघे, आदींची उपस्थिती होती.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी अभिषेक फुकट, बादल बोंबाटे, अमित भोयर, अमित वैद्य, राहुल ढोक, निखिल विघे, महेंद्र मिरासे,ऋषिकेश नेवारे, अमोल कडू, गजेंद्र ढोक, विक्की घोडे, दर्पण घोडे, अनुराग रडके, दादू नागोसे, अनुराग नागोसे,अभिजित लोहकरे, गोलू विघे, कृष्णा ठाकरे, शुभम वाणी, जवाहर ठाकरे, आदित्य चींचुलकर, नारायण वैद्य, सचिन हेटे, अमोल गजभिये, दीपक घोडे, मंगेश कोठाडे, दीपक दवंडे, अनिकेत हेटे, ऋषिकेश हेटे, निखिल लायबर, रोशन दवंडे, ऋषिकेश भोयर, प्रज्ज्वल कावळे, आदित्य मोहोतकर, कार्तिक झलके, महेंद्र भोयर, निखिल नेऊलकर, पंकज धर्मी, प्रतीक हिवरकर, नितीन पारेकर, अनिश पाली, जीवन विघे, राकेश टेंभरे, जतन तांबे, राकेश झलके आदींनी सहकार्य केले.