– संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 25 :- सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बांठिया आयोगाच्या ओबीसी आरक्षण बाबतच्या शिफारशी नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश देताच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान राज्य निवडणुक आयोगाने प्रत्येक महानगरपालिका , नगरपालिका व नगर पंचायत मधील ओबीसी आरक्षण टक्केवारी ची अधिसूचना काढली त्यामध्ये कामठी नगर परिषद क्षेत्रात ओबीसी आरक्षण हे 19.7 ठरविण्यात आले आहे त्यामुळे कामठी नगर परिषद च्या एकूण जागेपैकी नगरसेवकांच्या 6 जागा ओबीसी साठी आरक्षित झाल्याची अधिसूचना निवडणूक आयोगाने 22 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधीसुचनेत दिसून येते.त्यानुसार 13 जुलै ला काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीतील एस सी , एस टी च्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रवर्गातून ओबीसी आरक्षण साठी निवड करायची आहे.यानुसार मागील 13 जुलै ला जाहीर आरक्षण सोडतीनुसार एकूण सदस्य संख्या 34 त्यातील 50 टक्के आरक्षण महिलांसाठी राखीव असल्याचे गृहीत धरून उर्वरित 17 जागेसाठी आरक्षण काढण्यात आले होते त्यामध्ये 10 जागा अनुसूचित जाती तर 1 जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होत्या तर उर्वरीत सहा जागा ह्या सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण साठी आरक्षित होते यानुसार जाहीर झालेल्या एस सी, एस टी आरक्षण ला कुठलाही धक्का न लावता आरक्षण काढतेवेळी 6 जागेवर आरक्षण निघणार आहे यासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गातील 6 ईश्वरचीठठ्या सोडण्यात येतील त्यातील तीन नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला साठी ईश्वरचिट्ठी काढणार आहेत त्यातील उर्वरित तीन हे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ठरतील या सहा प्रभागात प्रभाग क्र 1, 2,6,7,8,11 चा समावेश राहणार आहे.या सहा प्रभागासाठी ओबीसी आरक्षण निघणार असल्याचे तर्क लावण्यात येत आहे.
मागील 13 जुलै ला झालेल्या आरक्षण सोडतीत एकूण जागेपैकी 10 जागा अनुसूचित जाती साठी आरक्षित झाल्या होत्या त्यातील 5 जागा ह्या अनुसूचित जाती महिला तर उर्वरित 5 जागा ह्या अनुसूचित जाती साठी आरक्षित ठरले होते त्यामध्ये प्रभाग क्र 3,4,9, 10,12,13,14,15,16,17 तर अनुसूचित जमाती साठी प्रभाग क्र 5 आरक्षित करण्यात आले होते त्यामुळे या आरक्षित प्रभागाला हात न लावता ओबीसो आरक्षण काढायचे असल्याने बांठिया आयोगाने अधोसुचनेत नमूद केल्याप्रमाणे6 जागा ची निवड करायची आहे.ज्यामध्ये प्रभाग क्र 1,2,6,7,8,11 चा समावेश राहणार आहे.
बॉक्स-सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण 27 टक्के देण्याचे आदेशीत केल्याप्रमाणे कामठी नगर पालिकेच्या एकूण 34 जागेनुसार 27 टक्के आरक्षणनूसार ओबीसींसाठी 9 जागा देने अपेक्षित आहे मात्र सुचविल्यानुसार 6 जागा ह्या जाहीर ओबीसी आरक्षणाच्या कक्षेत बसत नसल्याने न्यायालयीन आदेश देऊनही कामठी नगर परिषद प्रशासन जागा वाटपात पुन्हा ओबीसी वर अन्याय करीत असल्याचा आरोप नरेश चौकसे यांनी केला आहे तर यामुळे ओबीसी आरक्षणाची नगरसेवकांची संख्या कमी होऊन नगर परिषद अध्यक्ष पदावरही परिणाम होणार आहे याविरुद्ध न्यायालयीन व सार्वजनिक लढा उभारणार असल्याचा दावा नरेश चौकसे यांनी केला आहे