– इच्छुक अर्जदार यांनी ना.म.प्र.वि.प्रा. कार्यालय, ना.सु.प्र. संकुल, गोकुलपेठ, नागपूर येथुन आवेदन अर्ज प्राप्त करून त्यातील माहिती भरणा करून नोंदणी शुल्क रू. १०००/- (ना परतावा) भरणा करून अर्ज सादर करावे
नागपुर :- नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकणाव्दारे राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (घटक क्र. ३) अंतर्गत मौजा भिलगाव, खसरा क्रमांक १४६/३,४,५, १४६-१४१/१ ता. कामठी, जिल्हा नागपूर येथे आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील (E.W.S.) लोकांकरीता एकूण १९० घरकुले बांधण्यात आलेली आहेत.
मौजा भिलगाव, ख. क्र. १४६/३,४,५, १४६-१४१/१ ता. कामठी, जिल्हा नागपूर येथील १९० पैकी १३२ सदनिकांची सोडत मा. महानगर आयुक्त, ना.म.प्र.वि.प्रा. यांच्या दिनांक ०८/१०/२०२४ रोजीच्या निर्देशानुसार मा. सह आयुक्त, ना.म.प्र.वि.प्रा. यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ११/१०/२०२४ रोजीला ईश्वर चिठ्ठीव्दारे सोडत काढण्यात आलेली आहे. तसेच १९०पैकी ५८ सदनिका रिक्त आहेत.
उर्वरीत सदनिकांकरीता ग्रामपंचायत क्षेत्रातील इच्छुक अर्जदारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच इच्छुक अर्जदार यांनी ना.म.प्र.वि.प्रा. कार्यालय, ना.सु.प्र. संकुल, गोकुलपेठ, नागपूर येथुन आवेदन अर्ज प्राप्त करून त्यातील माहिती भरणा करून नोंदणी शुल्क रू. १०००/- (ना परतावा) भरणा करून अर्ज सादर करावे. तसेच अर्जासोबत अर्जदारांनी स्वतः चे आधार कार्ड (अविवाहित असल्यास) किंवा पती व पत्नीचे आधार कार्ड (विवाहित असल्यास) ची प्रत व भिलगाव ग्रामपंचायत रहवासी असल्याचा प्रमाणपत्र किंवा भिलगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असल्याचे रू. १०० मुद्रांकवर (Stamp paper) स्वयं घोषणापत्र (Affidavite only), मतदार यादीतील नावाची प्रत मतदार कार्डच्या प्रतसह सादर करणे अनिवार्य आहे.
अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची तपासणी करून पात्र अर्जदारांची यादी संकेत स्थळी (https://nmrda.neml.in/nit.nagpur.org) वर उपलब्ध करण्यात येईल व पात्र अर्जदारांची सोडत नियमानुसार करण्यात येईल.
सबब इच्छुक अर्जदारांनी दि. ३१.१२.२०२४ पर्यंत आवेदन अर्ज वरील कार्यालयातुन प्राप्त करून सादर करावे. दिनांक ३१.१२.२०२४ नंतरचे आवेदन अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही. सदर संधीचा लाभ इच्छुक अर्जदारांनी घ्यावा, असे संजय मीणा, महानगर आयुक्त, ना.म.प्र.वि.प्रा. तथा सभापती, ना.सु.प्र. यांनी आवाहन केले आहे.