नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (ता.७) रोजी शोध पथकाने ५४ प्रकरणांची नोंद करून १,४६,१०० रुपयाचा दंड वसूल केला आहे.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत १३ प्रकरणांची नोंद करून ५२०० रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत ५ प्रकरणांची नोंद करून ५०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु २००० दंड वसूल करण्यात आलेला आहे.वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तीक कामांकरीता बंद करणेबाबत एकूण 5 प्रकरणांची नोंद करून रु १९,००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. वैद्यकीय व्यावसायिकांनी बायोमेडिकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे या अंतर्गत एका प्रकरणाची नोंद करून १०,००० करण्यात आला. तर उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास १७ प्रकरणांची नोंद करून रु ३,४०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ६ प्रकरणांची नोंद करून रु ६००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. हरित लवाद यांनी दिलेल्या दिनांक 03/07/2017 च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह व लॉन्स यावर कार्यवाही करणे या अंतर्गत २ प्रकरणांची नोंद करून रु १,००,००० दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 54 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com