15 टिल्लू पंप जप्त,मनपा पाणीपुरवठा विभागाची कारवाई

चंद्रपूर :- शहरातील बालाजी वार्ड आणि बालाजी मंदिर परिसरात परिसरात महानगरपालिकेमार्फत टिल्लू पंप जप्तीची मोहीम राबविण्यात येऊन 15 ग्राहकांचे टिल्लू पंप जप्त करण्यात आले असुन त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करून नळ कपात करण्यात आली आहे.

मनपातर्फे शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक ( मीटर ) लावण्यात आले असुन मीटरचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. मात्र काही जागी मीटरला लावलेला पाईप काढुन पाणी भरत असल्याचे तसेच काही नागरिक टिल्लू पंपचा वापर करत असल्याचे आढळुन आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून जप्ती करण्यात आली आहे.

सर्व नळ जोडणींवर मीटर लावण्यात आले असल्याने पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढेच देयक येत असुन अनावश्यक खर्च व अनावश्यक पाण्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे.मात्र काही नागरिक नळाचे देयक कमी करण्याच्या दृष्टीने मीटरला लागुन असलेला पाईप काढतात ज्यामुळे पाण्याचा वापर करतांना मीटर बंद असते व बिल अतिशय कमी येते,शिवाय टिल्लु पंप द्वारे मोठ्या प्रमाणात पाणी एकाच कनेक्शनवर ओढले जाऊन इतर नळधारकांना अतिशय कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो.

त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम लक्षात घेता मनपातर्फे कारवाई सुरु असुन यापुढे अश्या प्रकारे पाणी भरतांना आढळल्यास त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मान्सूनपूर्व तयारीची कामे लवकरात लवकर पूर्ण करा - अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांचे निर्देश 

Thu May 15 , 2025
नागपूर :- पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी शहरातील सर्व भागात मान्सूनपूर्व कामे सुरु करावी व ती लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावीत, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी दिले. मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्तांनी बुधवारी (ता.१४) आढावा बैठक घेतली. मनपा मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त सभाकक्षात आयोजित बैठकीत उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त (उद्यान) गणेश राठोड, शिक्षणाधिकारी साधना सयाम, कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड, उद्यान अधीक्षक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!