कॉलनीतील रहिवाशी अतुल साठवणे यांच्यावर प्राणघातक हल्ला
नागपूर – मनीषनगर परिसर अमर संजय सोसायटी मध्ये कृष्णकुंज हॉटेल उघडलेला आहे. त्यामध्ये मुला-मुलींना रुम्स आणि रेस्टॉरंट प्रोवाईट करतात. मुलं आणि मुली कॉलनीच्या रस्त्यावर सिगरेट दारू, पिऊन हुलड बाजी करतात. अश्लील हरकत करून कॉलनीच्या रहवाशी लोकांना दादागिरी करून दाखवतात. अतुल साठवने यांनी विरोध केल्यावर कृष्णकुंज हॉटेलमध्ये आठ ते दहा लोकांनी प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर घरावरती जाऊन शिव्या गाळ, जीवे मारण्याची धमकी दिली. कृष्णाकुंज ओयो हॉटेल वाल्यांची दादागिरी पाहून कॉलनीच्या रहिवाशी लोकांनी जिल्हाधिकारी आर. विमला व पोलिस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस जॉईंट कमिशनर अश्विनी दोरजे, तहसीलदार पाटील बेलतरोडी सहाय्यक पोलीस अधिकारी व बेलतरोडी पोलीस निरीक्षक चंद्रकांत यादव या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेट घेऊन निवेदन दिले.
हॉटेलच्या लायसन्स रद्द करून बंद करण्यात यावे जे युवा जोडपे येऊन कॉलनी च्या लोकांना त्रास देत आहे ते बंद करावे. अन्यथा सर्व नागरिक रस्त्यावर येऊन आंदोलन करणार याची सर्व जबाबदारी मा.वरिष्ठ अधिकाऱ्यांची राहणार आहे. मनीषनगर परिसरात कॉलनी मध्ये रहिवाशी शिष्टमंडल नागरिक राधाताई साठवणे, सौ.पल्लवी दहीकर, सौ.पुष्पा तनखीवाले, सौ.देवला कावडकर, सौ.जयश्री देशपांडे, सौ.कांचन तोटे, सौ.प्रमिला कापसे, सौ.ज्योती शर्मा, जुही शर्मा, यादव राव लायबर, रामदास पाटील, अनिल वसुले, परसराम बानाईत, शांतीलाल ठाकरे, विनोद पागिरे, अभय धुर्वे, ए.पी.चक्रधरे, अशोक गिरडकर, एच.के.काटे, राजु भगत, प्रवीण बा.शर्मा मनोज तिवारी, आदि नागरिक उपस्थित होते.