बी फार्म ची तारीख वाढवा : बसपा

नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधीसभा (सिनेट) निवडणुकीसाठी पदविधरांची नुकतीच मतदार नोंदणी करण्यात आली. जुन्या मतदारांची नोंदणी रिन्यूअल करण्यासाठी फक्त तीन दिवसाचा अवधी देण्यात आला. या विधिसभेत पदविधरांचे 10 प्रतिनिधी निवडून जात असतात.

2005, 2011 व 2017 या वर्षात झालेल्या जुन्या पदवीधर मतदारांची नोंदणी साधारणत: 75 हजारावर आहे. आज नागपूर विद्यापीठाने दिलेल्या जाहिरातीनुसार फक्त तीन दिवस (25 ऑक्टोबर) असून हे तिन्ही दिवस सुट्ट्यांचे आहेत. त्यात दिवाळीसारखा सण आहे. अशा वेळेस 75 हजारातील मतदारांना व त्यांच्या प्रतिनिधींना बी फार्म भरणे अशक्य आहे. करिता 15 नोव्हेंबर पर्यंत ही मुदतवाढ करावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी यांना पत्रकाद्वारे केली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com