कोहळा येथे वाचन प्रेरणा दिन 

नागपूर :- जवळच्या कोहळा येथील जि. प. प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी प्रतिष्ठित नागरिक शामराव वरखडे होते .पोलीस पाटील महादेव राऊत, कवडापूर शाळेचे सहाय्यक शिक्षक सुरेश बनसूले आदी मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. ए. पी .जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करण्यात आले. वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व मुख्याध्यापक युसुफ पठाण यांनी प्रास्ताविकातून विशद केले. यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांकडून कथारुपी गोष्टीचे वाचन करून घेण्यात आले.

इयत्ता चौथीची विद्यार्थिनी अनुष्का कैलास कोकुर्डे, पूर्वी संजय शेंद्रे व तेजस्वी लीलाधर वाघाडे यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर सविस्तर भाषण दिले. शाळेतील सहाय्यक शिक्षक तुळशीराम रामाजी हूंगे यांनी कार्यक्रमाचे आयोजन व सूत्र संचालन केले,पूर्वी संजय शेंद्रे हिने उपस्थितांचे आभार मानले.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com